भारताची लाज राखणाऱ्या अश्विनचा शतकवीर खेळ

भारताची ६ बाद १४४ अशी बिकट अवस्था असताना, तारणहार ठरला तो रवीचंद्रन अश्विन. शतकवीर अश्विनच्या सुरेख खेळीने भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याला रवींद्र जडेजाची उत्तम साथ मिळाली, ज्यामुळे पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३३९ धावांपर्यंत मजल मारली.

चेन्नई:

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाची अवस्था अतिशय बिकट झाली होती. बांगलादेशच्या हसन महमुदने भारताला सलग धक्के दिले होते. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे तिन्ही स्टार फलंदाज स्वस्तात बाद झाले, त्यामुळे भारताची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली होती. यशस्वी जैस्वाल यावेळी संघर्ष करत होता, पण त्याला पंतची काही काळाची साथ मिळाली. पंतने ३९ धावा करताना चांगले फटकेबाजी केली, मात्र त्यानंतर तो बाद झाला. यशस्वीने अर्धशतक झळकावले, परंतु तोही फार काळ टिकला नाही. त्याने ५६ धावांची खेळी साकारली.

भारताची ६ बाद १४४ अशी अवस्था झाली असताना, अश्विन आणि जडेजा जोडीने किल्ला लढवला. अश्विनने सुरूवातीला फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर जडेजाच्या साथीने बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलाच धोबीपछाड दिला. अश्विनने १०२ धावांची नाबाद खेळी केली, तर जडेजानेही नाबाद ८६ धावांची महत्वाची खेळी साकारली.

दोघांच्या साथीने सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली आणि भारताला पहिल्या दिवशी ३३९ धावांपर्यंत पोहोचवले.

हे ही वाचा -श्रेयस अय्यरला साडेसातीचा फटका; सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद, मोठी संधी गमावली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top