मुंबई:
IPL 2024 मध्ये मुंबईची सुरुवात चांगली झालेली नाही. 4 पैकी फक्त एका सामन्यात मुंबई इंडियन्स जिंकला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये फक्त 2 गुण असून मुंबई शेवटून तिसऱ्या स्थानावर आहे. लागोपाठ 3 सामने हरल्यानंतर मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजय मिळाली. या पहिल्या विजयाने मुंबईच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी टीमचा कसून सराव सुरु आहे. आतापर्यंत मुंबईचे बॉलर्स काही खास खेळू शकलेले नाहीत. मुंबईच्या गोलंदाजांवर लसिथ मलिंगा विशेष मेहनत घेत आहेत. गोलंदाजांना चेंडू स्टम्पसना हिट करण्याची ट्रेनिंग दिली जात आहे. लसिथ मलिंगाने एक काळ असा चांगलाच गाजवला होता आणि आता तो मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याच्याशी साथीत अर्जुन तेंडुलकर गेल्या २-३ वर्षांपासून आपल्याला क्रिकेट खेळताना दिसत आहे. पण अर्जुन तेंडुलकर थेट मलिंगाशी स्पर्धा करायला गेला आणि या स्पर्धेत नेमकं जिंकलं तरी कोण, हे आता स्पष्ट झाले आहे.
असे काय घडलं हे जाणून घ्या.
लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक असल्याने तो आज खेळाडूंना गोलंदाजी शिकवत होते. त्यावेळी लसिथ मलिंगा यांनी एक स्पर्धा खेळण्याचे ठरवले. त्यात सर्वांना बॉल आऊट करण्याची स्पर्धा करायची असे ठरले. त्यानंतर बॉल आऊटसाठी एकच स्टम्प ठेवला आणि सगळयांनी गोलंदाजी करायला सांगण्यात आले. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी बॉल आऊट करायला सुरुवात केली. यामध्ये अर्जुन तेंडुलकरही होता.
अर्जुन तेंडुलकरने पण चेंडू टाकला खरा पण तो स्टम्पला लागलाच नाही. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अन्य गोलंदाजांनीही चेंडू टाकले खरे, पण कोणाचाच चेंडू यावेळी स्टम्पला लागला नाही.त्यानंतर मलिंगा चेंडू टाकण्यासाठी आला. त्यावेळी मलिंगा कसा चेंडू टाकणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती.
मलिंगा यावेळी चेंडू टाकायला आला. मलिंगाने काही जास्त रन अप घेतला नाही. थोडासा रन अप घेतला आणि चेंडू टाकला. तो चेंडू असा टाकला की तो थेट स्टम्पला जाऊन लागला. त्यानंतर मलिंगाने दोन्ही हात उंचावले आणि ही एवढी सोपी गोष्ट होती , हे सर्वांना सांगितले. पण मलिंगाने जेवढ्या सोप्या पद्धतीने ही गोष्ट साकारली, ती बाकी कोणालाच जमली नाही. त्यामुळेच मलिंगासारखा या जगात दुसरा गोलंदाज होऊच शकत नाही, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.मलिंगाने यावेळी संघातील सर्व गोलंदाजांना, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बाप हा बापच असतो, हे या एका गोष्टीमधून दाखवून दिले आहे.
लसिथ मलिंगा IPL Career
लसिथ मलिंगाने 2009 पासून मुंबई इंडियन्समध्ये खेळण्याची सुरुवात केली. 2019 साली त्याचा करिअर समाप्त झाला, पर्यंत मलिंगा मुंबई इंडियन्ससोबतच खेळला. त्याने 122 मैचांमध्ये 7.12 च्या इकोनॉमीने 170 विकेटे काढली. 2023 साली मुंबई इंडियन्सने मलिंगाला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त केली. मलिंगाने आपल्या बॉलिंग बळाच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सला कठीण परिस्थितीत सामना करून दिले. मुंबईच्या चालू सीजनमध्ये चेंडूचं विशेष कमाल दाखवणारी नव्हती. परंतु आशा आहे की, यॉर्कर किंग आणि बॉलिंग कोच मलिंगाच्या नेतृत्वाखाली गोलंदाज पुढच्या सीजनमध्ये चांगलं प्रदर्शन करेल.