लोकसभा निवडणूक निकाल 2024 विजयी उमेदवार

भारतीय लोकशाहीच्या निर्वहनासाठी भारतीय संविधानात दोन तऱ्हेच्या व्यवस्था दिल्या आहेत. एक म्हणजे लोकसभा आणि दुसरी म्हणजे राज्यसभा. लोकसभेत 543 सदस्य असून हे सदस्य थेट लोकांमधून निवडले जातात. या सभागृहाचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो. तसेच या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच सर्वसाधारण निवडणुका घेऊन नव्या सदस्यांची निवड केली जाते. लोकसभेला संसदेचं कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं. अशाच प्रकारचं दुसरं सभागृह राज्यसभा आहे. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या सभागृहातील सदस्यांची निवड करतात. राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारे लोकसभेच्या जागा निश्चित केल्या जातात. देशात लोकसभेची पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली होती.

विजयी उमेदवारांची नावे

मुंबई विभाग

  • दक्षिण मुंबई –  अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
  • दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
  • उत्तर मुंबई-  पियुष गोयल (भाजप) 
  • उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी) 
  • उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
  • ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
  • ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
  • कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)  
  • भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
  • पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप) 

कोकण विभाग

  • रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप) 

पश्चिम महाराष्ट्र विभाग

  • मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)
  • पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) 
  • शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • माढा – धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस) 
  • कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस) 
  • सांगली – विशाल पाटील (अपक्ष) 
  • सातारा – उदयनराजे भोसले (भाजप)
  • हातकणंगले – धैर्यशील माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)

विदर्भ

  • रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) 
  • नागपूर – नितीन गडरकरी (भाजप)
  • भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)
  • गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी) 
  • चंद्रपूर – प्रतिभा धारोरकर (काँग्रेस)
  • बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
  • अकोला – अनुप धोत्रे (विजयी) 
  • अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी) 
  • वर्धा – अमर काळे (विजयी) 
  • यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी) 
  • हिंगोली – नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट)

मराठवाडा 

  • नांदेड – वसंत चव्हाण (काँग्रेस) 
  • परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट) 
  • संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) 
  • बीड – 
  • जालना – कल्याण काळे (काँग्रेस) 
  • लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस) 
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)

उत्तर महाराष्ट्र

  • नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) 
  • नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस) 
  • जळगाव – स्मिता वाघ (भाजप) 
  • रावेर – रक्षा खडसे (भाजप) 
  • धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस)
  • दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)

देशात लोकशाही अस्तित्वात आली तेव्हा लोकसभेची सदस्य संख्या 500 होती. देशाची लोकसंख्या वाढल्यानंतर काळानुसार परिसीमन करण्यात आलं. शेवटचं परिसीमन 2008मध्ये झालं होतं. त्यानंतर देशातील लोकसभेच्या 573 जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. पुढील परिसीमन आता 2026मध्ये होणार आहे. एका अंदाजानुसार नव्या परिसीमनानंतर देशात लोकसभेच्या 78 जागा वाढणार आहेत. अंदाजानुसार, दक्षिणेत तामिळनाडूत 9, केरळमध्ये 6, कर्नाटकात दोन आणि आंध्रप्रदेशात 5 जागा वाढतील. त्याचप्रकारे तेलंगनात दोन, ओडिशात 3, गुजरातमध्ये 6, उत्तर प्रदेशात 14, आणि बिहारमध्ये 11 जागा वाढण्याची शक्यता आहे. तर, छत्तीगडमध्ये एक, मध्यप्रदेशात 5, झारखंडमध्ये एक, राजस्थानात 7 आणि हरियाणा आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन जागा वाढण्याचा अंदाज आहे. सध्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. वाराणासीतून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उत्तर प्रदेशातील लखनऊमधून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत. तर 26 लोकसभा जागा असलेल्या गुजरातमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विजयी झालेले आहेत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक 48, पश्चिम बंगालमध्ये 42 आणि बिहारमध्ये 40 जागा आहेत. तामिळनाडूत 39 जागा आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 बाबत संबंधित प्रश्न
प्रश्न – केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा काय?

उत्तर – केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी 272 जागांची आवश्यकता असते.

प्रश्न – 2019मध्ये वाराणासी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती टक्के मते मिळाली होती?

उत्तर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणासी लोकसभा मतदारसंघातून एकूण मतांपैकी 63.62% (674,664) मते मिळाली होती.

प्रश्न – उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा असलेलं राज्य कोणतं?

उत्तर – उत्तर प्रदेशानंतर (80) सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 48 जागा आहेत.

प्रश्न- बिहारमध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?

उत्तर – बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत.

प्रश्न- ईव्हीएमवर विश्वास ठेवला जाऊ शकतो का?

उत्तर – होय… याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळल्या आहेत. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं हे अजूनही कोणीच सिद्ध करू शकलेलं नाही.

प्रश्न- 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष कोणता?

उत्तर – भाजप आणि काँग्रेसनंतर डीएमकेने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या होत्या.

प्रश्न- अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला 2019मध्ये किती जागा मिळाल्या होत्या?

उत्तर – केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवर विजय मिळाला होता. पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातून हा विजय मिळाला होता. आपचे उमेदवार भगवंत मान हे निवडून आले होते.

प्रश्न- 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी वाड्रा यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती?

उत्तर – प्रियंका गांधी वाड्रा यांनी तेव्हा निवडणूक लढवली नव्हती.

प्रश्न- देशाच्या तिसऱ्या पंतप्रधानांचं नाव काय होतं?

उत्तर – इंदिरा गांधी या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या.

प्रश्न- राजीव गांधी यांच्यानंतर पंतप्रधानपदी कोण बसलं?

उत्तर – राजीव गांधी यांच्यानंतर व्हीपी सिंह देशाचे पंतप्रधान होते.

प्रश्न- सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा मान कुणाला मिळाला?

उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. नेहरू तब्बल 17 वर्ष पंतप्रधान पदावर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top