पावसाची अचानक सर भर उन्हाळ्यात

अमरावती जिल्ह्यात 55 हजारांपेक्षा अधिक हेक्टरचे नुकसान

सलग दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यात तब्बल 55 हजार 596 हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झाले आहे तसेच 1566 घरांची पडझड झाली आहे.

हवामान विभागानुसार, राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. भर उन्हाळ्यात सलग कोसळणारे अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकाऱ्यांची दाणादाण उडवली आहे. अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे तब्बल 55 हजार 596 हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झाले आहे. तसेच, 1566 घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांत, उदाहरणार्थ, अकोला, वर्धा, वाशिम, बुलढाण, ह्यांसह दमदार पवसासह विजांचा कडकडाट आणि 30-60 प्रति तास सोसाट्याचा वारा अनुभवला जात आहे. पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

भर उन्हाळ्यात पावसाची झड

राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली होती, त्यामुळे आज पहाटेपासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात दमदार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, अलिकडे झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकडया पासून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे या अवकळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. आज बुलढाण्यातील अनेक भागात सलग चौथ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पवसामुळे तुफान गारपीट झाली आहे. यात जिल्ह्यातल्या मेहकर , मोताळा तालुक्यात गारपीटीमुळे शेतमालाचे मोठ नुकसान झाले आहे. यात संत्रा, तीळ, लिंबू, गहू, ज्वारी, भाजीपाला, केळी, आंबा आणि पपईचा समावेश आहे.

शेतकाऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

विदर्भासह मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यात बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे आंबा, टरबूज यांच्यासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी मागणी करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या बागा अक्षरक्ष: उद्ध्वस्त झाल्या आहेत. टरबूज, उन्हाळी बाजरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे देखील अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकाऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकळीने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी या पिकांच्या नुकसानाची तात्काळ पाहणी आणि पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top