8 रुपयांच्या शेअरने आज केले मालामाल

Share Market मध्ये आज सोलर कंपनीने धुवांधार बॅटिंग केली. कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. गुरुवारी हा शेअर 5 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आज1773.35 रुपयांवर व्यापार करत होता. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 4 वर्षांत 22,000 टक्क्यांची तेजी आली आहे.

शेअर बाजारात अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना लॉटरी लावतात. सोलर कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअरने सु्द्धा अशीच कमाल केली. या शेअरने अवघ्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करुन दिली. गुरुवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजीची वाढ दिसून आली. हा शेअर1773.35 रुपयांवर व्यापार करत होता. गेल्या चार वर्षांत हा शेअर 8 रुपयांहून 1700 रुपयांवर पोहचला आहे. केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअरने या कालावधीत गुंतवणूकदारांना 22,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळवून दिला.

8 रुपयांहून 1700 रुपयांची भरारी

KPI Green Energy च्या शेअरने गेल्या 4 वर्षांत मोठा पल्ला गाठला. कंपनीचा शेअर 17 एप्रिल 2020 रोजी 8 रुपये होता. तर कंपनीचा शेअर गुरुवारी 18 एप्रिल 2024 रोजी1773.35 रुपयांवर होता. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक1895.95 रुपये इतका आहे. तर या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 309 रुपये आहे.

एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 457 टक्के उसळी

स्मॉलकॅप कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीचा शेअर गेल्या एका वर्षात 457 टक्क्यांनी उसळला. कंपनीचा शेअर 18 एप्रिल 2023 रोजी318.77 रुपयांवर होता. तर या कंपनीचा शेअर आज 18 एप्रिल 2024 रोजी1773.35 रुपयांवर आहे. गेल्या सहा महिन्यात सोलर कंपनीच्या शेअरमध्ये 207 टक्क्यांची जबरदस्त उसळी दिसून आली. एकाच वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 86 टक्क्यांची तेजी दिसून आली.

1 लाखांचे झाले 8 लाख

TRIL चा शेअर गेल्या 12 व्यापारी सत्रात तेजीत आहे. एका वर्षापूर्वी म्हणजे 10 एप्रिल 2023 रोजी या शेअरची किंमत59.45 रुपये होती. आता ती वाढून 517 रुपये इतकी झाली आहे. याचा अर्थ या मल्टिबॅगर शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास 770 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज या गुंतवणुकीचे मूल्य रुपये झाले असते.

सूचना हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top