नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती;

jobs 1
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती; 3

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘अनुरेखक (गट-क)’ आणि ‘कनिष्ठ आरेखक (गट-क)’ या संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

रिक्त पदांचा तपशील:

  1. जाहिरात क्र. ३/२०२४
    • पदाचे नाव : अनुरेखक (गट-क)
    • एकूण रिक्त पदे : १२६
    • वेतन स्तर : एस-७ (₹२१,७०० – ₹६९,१००)
    • अंदाजे वेतन दरमहा : ₹४२,०००/-
  2. जाहिरात क्र. २/२०२४
    • पदाचे नाव : कनिष्ठ आरेखक (गट-क)
    • एकूण रिक्त पदे : २८
      (अजा – ३, अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ५, शा व शैमाप्र – ३, आदुघ – ३, खुला – ७)
    • महिलांसाठी राखीव पदे : ८
    • दिव्यांगांसाठी राखीव : १ (कॅटेगरी D/ HH)
    • वेतन स्तर : एस-८ (₹२५,५०० – ₹८१,१००)
    • अंदाजे वेतन दरमहा : ₹४८,०००/-

पात्रता निकष (दोन्ही पदांसाठी):

  • शैक्षणिक पात्रता : १२ वी नंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षांचे आरेखक (स्थापत्य) प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  • तांत्रिक अर्हता : ‘AutoCAD’ किंवा ‘Geographical Information System in Spatial Planning’ चे प्रमाणपत्र आवश्यक.

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क:

  • अर्ज शुल्क :
    • सामान्य प्रवर्गासाठी – ₹१,०००/-
    • राखीव प्रवर्गासाठी – ₹९००/-
    • माजी सैनिकांसाठी – शुल्क माफ.
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख : १८ नोव्हेंबर २०२४, रात्री ११.५९ वाजेपर्यंत (ऑनलाइन पद्धतीने).

वयोमर्यादा (दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी):

  • सामान्य प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय, खेळाडू, आदिवासी : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त : १८ ते ४५ वर्षे
  • पदवीधर अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिकांना सशस्त्र दलातील सेवेनुसार ३ वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सूट.

अर्ज आणि निवड प्रक्रिया:

  • अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : www.dtp.maharashtra.gov.in
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ नोव्हेंबर २०२४, रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • निवड प्रक्रिया :
    • दोन स्तरांवर परीक्षा घेतली जाईल.
    • पहिला स्तर – बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षा, ज्यामध्ये किमान ४५% गुण आवश्यक.
    • दुसरा स्तर – व्यावसायिक चाचणी परीक्षा.

उमेदवारांना अधिक माहिती आणि अर्जाचा तपशील www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in, आणि https://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top