महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथविधी 2024
मुंबईतील मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी लागणारी सगळी तयारी करण्यात आली आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे .त्यामुळे भाजप महायुतीचाच उमेदवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे.त्यातच काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली.त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.चला मग जाणून घेऊयाहा शपथविधी सोहळा कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार.
शपथविधी सोहळा कुठे होईल ?
महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथविधी 2024 सोहळा गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर करण्याचे ठरवले आहे त्यासाठी जय्यत तयारीही सुरु आहे.आझाद मैदानात 30 हजारपेक्षा जास्त नागरिक बसतील एवढा मोठा मंडप बांधत आहे.तसेच आझाद मैदानावर 100 बाय 100 चं मुख्य स्टेज उभारण्यात येत असून त्याच्या बाजूला दोन स्टेज बांधण्यात येत आहे.हा संपूर्ण सजावट स्टेज आणि मंडप भगव्या रंगाचे असेल.या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि देशातील इतर सर्व राज्यातील मुख्यमंत्री उपस्थिती लावतील
शपथविधी सोहळ्याची वेळ?
महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथविधी 2024 सोहळ्याला आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होईल नंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.तसेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे सोहळ्याचं स्वरूप कमी वेळाचे करण्यात आलं आहे. तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडेल. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल .