महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024:
20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होत असून पहिल्या टप्प्यातील कल समोर येऊ लागले आहेत. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की मविआ सत्ता स्थापन करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE: ताज्या अपडेट्स
- 23 Nov 2024 01:27 PM (IST)
Mawal Election Result 2024 : मावळ मतदारसंघाचा निकाल समोर, कोण झालं विजयी ?
मावळ विधानसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. 29 व्या फेरीअखेर मावळमध्ये महायुतीमधील अजित पवार गटाचे सुनील शेळके यांचा विजय झाला आहे. शेळके हे 1 लाख 08 हजार,565 मतांनी विजयी झाले. बापू भेगडे यांचा पराभव झाला.
- 23 Nov 2024 01:20 PM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उधळला विजयाचा गुलाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि शिंदे गटालाही अभूतपूर्व यश मिळालं. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर सर्व नेते, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले, पेढे भरवत त्यांनी विजयी गुलाल उधळला.
- 23 Nov 2024 01:01 PM (IST)
Kurla Election Result 2024 : कुर्ल्यातून शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर विजयी
कुर्ला मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांचा विजय झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मोरजकर यांचा त्यांनी पराभव केला. - 23 Nov 2024 12:56 PM (IST)
Mankhurd Election Result 2024 : मानखुर्द -शिवाजीनगरमध्ये नवाब मलिकांना पराभवाचा धक्का
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवाब मलिक यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या मतदारसंघातून अबू आझमी यांचा विजय झाला आहे. - 23 Nov 2024 12:53 PM (IST)
Pune Election Result 2024 : पुणे कॅन्टोनमेंटचा निकाल समोर, कोण विजयी ?
पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या रमेश बागवेंना पराभवाचा धक्का बसला आहे. - 23 Nov 2024 12:50 PM (IST)
Andheri Election Result 2024 : अंधेरी पूर्वमधून शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांचा विजय
अंधेरी पूर्व मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांनी विजय मिळवला आहे. - 23 Nov 2024 12:49 PM (IST)
Nifad Election Result 2024 : निफाडमधून अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी
निफाडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप बनकर यांचा विजय झाला आहे.
23 Nov 2024 12:31 PM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: भाजप आणि महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया
महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले, “देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम यामुळे त्याला हा मोठा विजय मिळाला आहे. महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवावे.”देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबासाठी हा ऐतिहासिक विजय अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
- 23 Nov 2024 12:23 PM (IST)
- महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: नाशिक जिल्ह्यात महायुतीची वर्चस्व, 15 पैकी 13 जागांवर आघाडी
- नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. दरम्यान, मालेगावमध्ये अपक्ष उमेदवार तर कळवणमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेपी गावित आघाडीवर आहेत.
- जागावार आघाडीचा आढावा:
- नाशिक पूर्व: राहुल ढिकले (भाजप)
- नाशिक मध्य: देवयानी फरांदे (भाजप)
- नाशिक पश्चिम: सीमा हिरे (भाजप)
- देवळाली: सरोज आहेर (अजित पवार गट)
- इगतपुरी: हिरामण खोसकर (अजित पवार गट)
- सिन्नर: माणिकराव कोकाटे (अजित पवार गट)
- दिंडोरी: नरहरी झिरवाळ (अजित पवार गट)
- कळवण: जेपी गावित (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)
- बागलाण: दिलीप बोरसे (भाजप)
- चांदवड: राहुल आहेर (भाजप)
- निफाड: दिलीप बनकर (अजित पवार गट)
- नांदगाव: सुहास कांदे (शिंदे गट)
- येवला: छगन भुजबळ (अजित पवार गट)
- मालेगाव बाह्य: दादा भुसे (शिंदे गट)
- मालेगाव मध्य: आसिफ शेख (अपक्ष)
- नाशिक जिल्ह्यातील निकाल महायुतीसाठी उत्साहवर्धक असून, विरोधकांना कठीण आव्हान ठरत आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: लँडस्लाईड विजयावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
“महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे मनःपूर्वक आभार! राज्यात महायुतीला लँडस्लाईड विजय मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो,” अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले, “लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी आणि समाजातील प्रत्येक घटकाने भरभरून मतदान केले. गेल्या दोन-अडीच वर्षांत महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती जनतेने या निवडणुकीत दिली आहे. जनतेचा हा विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या आशीर्वादाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.”
23 Nov 2024 11:56 AM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंना मोठा धक्का, चंद्रकांत पाटील आघाडीवर
मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील 20 हजार840 मतांनी आघाडीवर आहेत. रोहिणी खडसे पिछाडीवरच आहेत. एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.
- 23 Nov 2024 11:50 AM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : श्रीवर्धनमधून अदिती तटकरे यांचा विजय
श्रीवर्धनमधून अदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत. तर खानापूरमधून शिंदे गटाचे सुहास बाबर हे विजयी झाले आहेत. - 23 Nov 2024 11:48 AM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : कर्जत-जामखेडमध्ये अखेर रोहित पवार आघाडीवर
कर्जत जामखेडमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार हे आघाडीवर आले आहेत. सातव्या फेरीत ते 634 मतांनी आघाडीवर असून राम शिंदेंना धक्का बसला आहे.
- 23 Nov 2024 11:40 AM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : अहिल्यानगर – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर
13 व्या फेरी अखेर नगर मतदार संघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 23712 मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर 23 हजार 712 मतांनी पिछाडीवर आहेत. - 23 Nov 2024 11:35 AM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : माढा अभिजीत पाटील आघाडीवर
माढा मतदारसंघात अभिजीत पाटील हे 2289 मतांनी आघाडीवर आहेत.
- 23 Nov 2024 11:29 AM (IST)
Worli Election Result 2024: वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार यांची आघाडी भक्कम
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे आशिष शेलार यांची आघाडी 14 हजारांहून अधिक मतांनी कायम.
आशिष शेलार: 25,590 मते
आसिफ झकेरिया: 10,775 मते
- 23 Nov 2024 11:15 AM (IST)
- Maharashtra Election Results 2024: मंगल प्रभात लोढा विजयाच्या उंबरठ्यावर
मलबार हिल मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. - 12व्या फेरीअखेर लोढा यांचे मताधिक्य 36 हजारांचा टप्पा पार.
मंगल प्रभात लोढा: 57,390 मते
भैरुलाल चौधरी (ठाकरे गट): 21,028 मते
- 23 Nov 2024 11:04 AM (IST)
धाराशिवच्या परंडा मतदारसंघात चुरशीची लढत - धाराशिव अपडेट – राहुल मोटे आणि तानाजी सावंत यांच्यात तीव्र सामना.
- सहाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे राहुल मोटे केवळ 65 मतांनी आघाडीवर.
- 23 नोव्हेंबर 2024, 10:52 AM (IST)
- चाळीसगाव निवडणूक निकाल 2024 : मंगेश चव्हाण यांची आघाडी कायम
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांची आठव्या फेरीतही आघाडी कायम आहे. सहाव्या फेरीअखेर त्यांनी तब्बल 30,600 मतांची आघाडी घेतली आहे. - 23 नोव्हेंबर 2024, 10:45 AM (IST)
वरळी निवडणूक निकाल 2024 : “कुछ तो गडबड है” – संजय राऊत
“आत्तापर्यंतचे निकाल पाहता कुछ तो गडबड आहे. हा जनतेचा खरा कौल वाटत नाही,” असे वक्तव्य संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केले. त्यांनी शंका व्यक्त करत विचारले, “शिंदे गटातील सर्व आमदार कसे काय निवडून येतात?”
- 23 नोव्हेंबर 2024, 10:33 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मोठा धक्का, अनेक जेष्ठ नेते पिछाडीवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना मोठा फटका बसलेला दिसत आहे. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत, तर बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि अमित देशमुख हेही पराभवाच्या छायेत आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 10:30 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: बंडानंतरही एकनाथ शिंदेंना मोठं यश, ठाकरेंना मोठा धक्का
महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीत सामील झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने मोठं यश मिळवलं आहे. शिंदे गट 58 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 50 पेक्षा कमी जागांवरच आघाडी मिळालेली दिसत आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 10:27 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: खानापूरमध्ये शिंदे गटाचे सुहास बाबर मोठ्या आघाडीवर
सांगलीतील खानापूर मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे सुहास बाबर पाचव्या फेरीत 19,452 मतांनी आघाडीवर आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव पाटील पिछाडीवर गेले आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 10:25 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: नांदेड पोटनिवडणुकीत भाजपचे संतूक हंबर्डे आघाडीवर
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे संतूक हंबर्डे आघाडीवर असून, विरोधकांना जोरदार झटका बसला आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 10:17 AM (IST)
Anushakti Nagar Election Result 2024: अणुशक्ती नगरमध्ये सना मलिक आघाडीवर, फहाद अहमद पिछाडीवर
अणुशक्ती नगर मतदारसंघात चौथ्या फेरीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांनी 10,644 मतांसह आघाडी घेतली आहे. शरद पवार गटाचे फहाद अहमद 9,253 मतांसह पिछाडीवर आहेत. - 23 नोव्हेंबर 2024, 10:14 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: जालना जिल्ह्यात भाजपचे तीन आणि शिंदे गटाचे दोन उमेदवार आघाडीवर - जालना जिल्ह्यात भाजपचे संतोष दानवे, बबनराव लोणीकर, आणि नारायण कुचे आघाडीवर आहेत. तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि हिकमत उडान यांचीही आघाडी कायम आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 10:12 AM (IST)
Parli Election Result 2024: धनंजय मुंडेंना 22 हजार मतांची मोठी आघाडी
परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे तब्बल 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 10:09 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: महायुती 188 तर मविआ फक्त 87 जागांवर आघाडीवर
महायुतीत भाजप 107, शिंदे गटाची शिवसेना 49 आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे.
महाविकास आघाडी फक्त 87 जागांवर आघाडीवर असून त्यात काँग्रेस 31, शिवसेना (ठाकरे गट) 23 आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे.
- 23 Nov 2024 10:06 AM (IST)
Kudal Election Result 2024 : कुडाळमध्ये निलेश राणे आघाडीवर , - वैभव नाईकांना मोठा धक्काकुडाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे हे 280 मतांनी पुढे आहेत. वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर गुहागरमधून भास्कर जाधव हे 7 हजार 700 मतांनी आघाडीवर आहेत.
- 23 Nov 2024 10:04 AM (IST)
Shiwadi Election Result 2024 : शिवडीतून बाळा नांदगावकर पिछाडीवर
शिवडीतून मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अजय चौधरी हे आघाडीवर आहेत.
- 23 Nov 2024 09:58 AM (IST)
Ghatkopar Election Result 2024 : घाटकोपर पूर्व मधून पराह शाह आघाडीवर
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पराग शाह आघाडीवर आहेत.
पराग शाह – भारतीय जनता पक्ष – 12601
राखी जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 7427
- 23 नोव्हेंबर 2024, 09:49 AM (IST)
Malabar Hill Election Result 2024: मंगलप्रभात लोढा मोठ्या मतांनी आघाडीवर
मलबार हिल मतदारसंघात भाजपचे मंगलप्रभात लोढा 7,000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
विलेपार्ले मतदारसंघातही भाजपचे पराग अळवणी 1,000 मतांनी पुढे आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 09:46 AM (IST)
Mahim Election Result 2024: राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर
माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मोठा धक्का सहन करत तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.
ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे सदा सरवणकर दुसऱ्या स्थानावर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 09:41 AM (IST)
Anushakti Nagar Election Result 2024: स्वरा भास्करच्या पतीची आघाडी, अजित पवार गट पिछाडीवर
अणुशक्तिनगर विधानसभेत अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद आघाडीवर आहेत.
अजित पवार गटाच्या सना मलिक या पिछाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 09:38 AM (IST)
Vikhroli Election Result 2024: विक्रोळीमध्ये सुनील राऊत आघाडीवर - विक्रोळी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर शिवसेना (ठाकरे गट) चे सुनील राऊत आघाडीवर आहेत.
सुनील राऊत: 3800 मते
सुवर्णा करंजे: 2712 मते
विश्वजी ढोलम: 915 मते
- 23 नोव्हेंबर 2024, 09:36 AM (IST)
Ahilyanagar Election Result 2024: संग्राम जगताप मोठ्या मतांनी आघाडीवर, शरद पवार गटाला धक्का
अहिल्यानगर मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संग्राम जगताप 9960 मतांनी आघाडीवर आहेत. शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर पिछाडीवर गेले आहेत. - संग्राम जगताप: 6676 मते
- अभिषेक कळमकर: 2941 मते
- 23 नोव्हेंबर 2024, 09:33 AM (IST)
Bandra Election Result 2024: वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई आघाडीवर
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत, तर झिशान सिद्दीकी पिछाडीवर आहेत. - 23 नोव्हेंबर 2024 09:31 AM (IST)
Achalpur Election Result 2024 : अचलपूरमध्ये बच्चू कडूंना धक्का, कोण आहे आघाडीवर ?
अचलपूर मतदारसंघात बच्चू कडूंना मोठा धक्का बसला आहे, ते पिछाडीवर आहेत. भाजपचे प्रवीण तायडे यांनी आघाडी घेतली आहे.
- 23 नोव्हेंबर 2024 09:26 AM (IST)
Mahim Election Result 2024 : माहीममध्ये अमित ठाकरेंना धक्का, कोण आघाडीवर ?
माहीम मतदारसंघात तिरंगी लढत असून मनसेचे अमित ठाकरेंना धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे आघाडीवर आहेत.अमित ठाकरे – 2 हजार 156 मतंमहेश सावंत – 2हजार 142 मतंसदा सरवणकर – 2 हजार 270 मतं
- 23 नोव्हेंबर 2024, 09:23 AM (IST)
Mankhurd Election Result 2024: नवाब मलिक तिसऱ्या स्थानावर, मोठा धक्का
मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अबू आझमी 3884 मतांसह आघाडीवर आहेत, तर अतिक खान (MIM) 3617 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. नवाब मलिक यांना केवळ 461 मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024 09:19 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : भुजबळ कुटुंबाला मोठा धक्का, काका-पुतणे दोघेही पिछाडीवर
भुजबळ कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. येवल्यातून छगन भुजबळ हे पिछाडीवर आहेत. तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे नांदगावमधून पिछाडीवर आहेत. दुसऱ्या फेरी अखेरीस शिंदे गटाचे सुहास कांदे 8200 मते घेऊन आघाडीवर आहेत. त्यामुळे भुजबळ कुटुंबात चुळबुळ निर्माण झाली आहे. - 23 नोव्हेंबर 2024 09:17 AM (IST)
Shirol election Result 2024 : शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र यड्रावर आघाडीवर
शिरोळ मतदारसंघात अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावर हे आघाडीवर आहेत. त्यांना 6700 मतांची आघाडी मिळाली आहे.
- 23 नोव्हेंबर 2024 09:14 AM (IST)
Jalgaon election Result 2024 : जळगाव – भुसावळ मतदारसंघात भाजपचे संजय सावकारे 3789 मतांनी आघाडीवर
जळगाव – भुसावळ मतदारसंघात पहिल्या फेरी अखेर भाजपचे संजय सावकारे 3789 मतांनी आघाडीवर
भाजप – संजय सावकारे 5546 मतं
काँग्रेसचे राजेश मानवतकर 1757 मतं
- 23 नोव्हेंबर 2024, 09:10 AM (IST)
भाजपचे शिवेंद्रराजे भोसले मोठ्या मतांनी आघाडीवर
सातारा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांनी 8613 मतांची मोठी आघाडी घेतली आहे.
- भाजप – शिवेंद्रराजे भोसले: 11,015
- उबाठा – अमित कदम: 2,402
- 23 नोव्हेंबर 2024, 09:08 AM (IST)
कणकवलीत नितेश राणेंना दिलासा, हजार मतांची आघाडी - कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे 1048 मतांनी आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 09:06 AM (IST)
कळवा-मुंब्रा निकाल 2024: जितेंद्र आव्हाड 3 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर - कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे 3 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 09:04 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: महायुती आणि महाविकास आघाडीत तीव्र चुरस
महायुतीने 137 जागांवर आघाडी घेतली आहे, तर महाविकास आघाडी 134 जागांवर आघाडीवर आहे.
23 नोव्हेंबर 2024 09:01 AM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : इंदापूरमध्ये दत्ता भरणे आघाडीवर, शरद पवार गटाला धक्का
इंदापूर मतदारसंघातून अजित पवार गटाचे उमेदावर दत्ता भरणे हे 336 मतांनी आघाडीवर आहेत. शरद पवार गटाला धक्का बसला असून हर्षवर्धन पाटील पिछाडीवर गेले आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024 08:58 AM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : नागपूर दक्षिण-पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस यांची आघाडी कायम
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत तर प्रफुल गुडदे हे पिछाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024 08:53 AM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर
येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे पिछाडीवर गेले आहेत. माणिकराव शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. - 23 नोव्हेंबर 2024 08:50 AM (IST)
Thane election Result 2024 : कोपरी-पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे आघाडीवर
एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 08:48 AM (IST)
Baramati Election Result 2024: ईव्हीएम मतमोजणी सुरू होताच ट्विस्ट; अजित पवार आघाडीवर
ईव्हीएम मतमोजणी सुरू झाल्यानंतर बारामतीत नाट्यमय बदल झाला आहे. अजित पवार यांनी आघाडी घेतली असून युगेंद्र पवार आता पिछाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 08:46 AM (IST)
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE: महायुती 125, मविआ 106 जागांवर आघाडीवर
महायुती 125 जागांवर, तर मविआ 106 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 11 जागांवर आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024 08:43 AM (IST)
घाटकोपर : घाटकोपरमध्ये भाजपचे राम कदम यांची आघाडी.
घाटकोपरमध्ये भारतीय जनता पक्षाचे राम कदम हे आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024 08:42 AM (IST)
नागपूर : उत्तर नागपूरमधून नितीन राऊत यांची आघाडी
उत्तर नागपूर मतदार संघात काँग्रेसचे नितीन राऊत हे पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 08:40 AM (IST)
येवला : येवल्यात छगन भुजबळ आघाडीवर.
नाशिक जिल्ह्यातील मतमोजणी सुरू झाली असून येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 08:37 AM (IST)
वडाळ्यात : वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर आघाडीवर.
वडाळ्यातून पहिला कल जाहीर झाला असून भाजपचे कालिदास कोळंबकर आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 08:33 AM (IST)
Baramati : पोस्टल मतांमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर, अजित पवार पिछाडीवर.
बारामतीमध्ये पोस्टल मतमोजणी सुरू असून मतदारांनी युगेंद्र पवारांना अधिक पसंती दिल्याचे दिसत आहे. युगेंद्र पवार पोस्टल मतांमध्ये आघाडीवर असून अजित पवार अद्याप पिछाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 08:29 AM (IST)
वांद्रे : वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आशिष शेलार आघाडीवर
वांद्रे पश्चिम येथे पोस्टल मतमोजणी सुरू असून पहिला कल हाती आला आहे. भाजपचे आशिष शेलार या मतदारसंघात आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 08:26 AM (IST)
माहीम निवडणूक निकाल 2024: माहीममधील पहिला कल हाती, अमित ठाकरे आघाडीवर.
माहीममध्ये पोस्टल मतमोजणी सुरू झाली असून मनसेचे अमित ठाकरे आघाडीवर आहेत. या मतदारसंघात अमित ठाकरे, शिवसेना (शिंदे गट) चे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत आहे. - 23 नोव्हेंबर 2024,8:24 AM:
लातूर: लातूर शहरात अमित देशमुख पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत, तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 8:22 AM:
कराड दक्षिण: कराडमध्ये अजून मतमोजणी सुरू झालेली नाही. प्रशासनाच्या नियोजनातील गोंधळामुळे विलंब होत आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 8:19 AM:
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये पोस्टल मतमोजणी सुरू आहे.
- औरंगाबाद पूर्व: भाजपचे अतुल सावे आघाडीवर
- औरंगाबाद पश्चिम: शिंदेसेनेचे संजय शिरसाट आघाडीवर
- औरंगाबाद मध्य: शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर
- 23 नोव्हेंबर 2024, 8:17 AM:
डोंबिवली: भाजपचे रवींद्र चव्हाण पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत, तर दीपेश म्हात्रे पिछाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 8:15 AM:
कागल: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजित घाटगे आघाडीवर असून हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 8:14 AM:
वरळी: उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 8:08 AM:
बारामती: अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर असून अजित पवार पिछाडीवर आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 8:05 AM:
साकोली: पोस्टल मतमोजणीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 8:02 AM:
सातारा: भाजपचे शिवेंद्र राजे भोसले पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत.
- 23 नोव्हेंबर 2024, 8:01 AM:
महाराष्ट्राच्या विधानसभा निकालासाठी पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे. काही वेळातच पहिला अधिकृत कल हाती येणार आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 7:55 AM:
नालासोपारा: कॅशकांडामुळे चर्चेत आलेल्या नालासोपारा मतदारसंघाचा निकाल लवकरच जाहीर होईल. येथील मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. भाजपाचे राजन नाईक आणि विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांच्यात काट्याची टक्कर आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 7:52 AM:
माहीम: ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी अटीतटीच्या लढतीत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
- 23 नोव्हेंबर 2024, 7:26 AM:
परभणी: सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. 72% मतदानाची नोंद झाल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- 23 नोव्हेंबर 2024, 6:33 AM:
विदर्भातून, विशेषतः नागपूरमधून, पहिला कल अपेक्षित आहे. साधारणपणे सकाळी 8:45 वाजता हा कल हाती येईल.
निकालांच्या ताज्या अपडेट्ससाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलं आहे.